Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेळी येथून २७ लाख रूपये किंमतीचे बांधकामाच्या साहित्यांची चोरी; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बेळी येथील सोनाई कन्स्ट्रक्शन कंपनीचे बांधकामाचे साहित्य असा एकुण २७ लाख ५० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीसात तरूणासह ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील नशिराबाद येथून जवळ असलेल्या बेळी गावाजवळ सोनाई कन्स्ट्रक्शन कंपनीचे बांधकाम करण्याचे साहित्य ठेवण्यात आले आहे. २२ मार्च २०२० ते २४ डिसेंबर २०२० दरम्यान कंपनीच्या मालकीचे २ लाख रूपये किंमतीचे जोसेफ रोलर, साडे सात लाख रूपये किंमतीचे पेव्हर मशीन, ३ लाख रूपये किंमतीचे सेटींग सामान, १ लाख रूपये किंमतीचे स्क्रॅप सामान, २ लाख रूपये किंमतीचे स्टील शिट आणि १२ लाख रूपये किंमतीचे (एमच २० एटी ७१७८), एमएच २० एटी ७१७५ आणि एमएच २० एटी ७१६६ डंपर असा एकुण २७ लाख ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल संशयित भुषण हर्षल महाजन (वय-३७) याच्यासह ४ ते ५ जणांनी ऑक्सीजन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून चोरून नेल्याची फिर्याद दाखल केले. कंपनीचे मॅनेजर रोशन कुमार पाठक (वय-३५) रा. औरंगाबाद यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भुषण महाजन याच्यासह इतर ४ ते ५ जणांविरूध्द नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि राजेंद्र साळुंखे करीत आहे.

Exit mobile version