बेरोजगारीचा भस्मासुर; रावेर महसूल विभागात पाच तलाठी उच्चशिक्षित

raver tahasil

रावेर प्रतिनिधी । राज्यात बेरोजगारीचा भस्मासुर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की उच्च शिक्षण घेतलेले तरूण मिळेल ती नोकरी करण्यासाठी मजबूर झालेले दिसत आहे. स्पर्धेच्या युगात शिक्षणासोबत नोकरीची स्पर्धा देखिल मोठी वाढली दिसते याचे उदाहरण म्हणजे रावेर महसूल विभागात उच्च शिक्षण घेतलेले तीन तरूण तलाठी म्हणून रुजू झालेले.

रावेर महसूल विभागाला नुकतेच 5 उच्च शिक्षण झालेले तलाठी रुजू झालेले आहे. यात निलेश पदमाकर पाटील हे बीसीई झालेल्या तरूणाला तलाठी म्हणून प्राथमिक स्वरुपात बलवाडी दिले आहे तर रवी भागवत शिंगणे या बिई मेकॅनिकल तरूणाला अटवाडे, काजल चूडामण पाटील ह्या बीई इलेट्रॉनिक झालेल्या तरूणीला मोरगाव, भाग्यश्री किशोर बर्वे या एम.कॉम झालेल्या तरूणाली थेरोळा तर रोशनी रामचंद्र शिंदे या एम.कॉम. झालेल्या युवतीला खिरोदा प्र. यावल देण्यात आले आहे. पाचही नवनिर्वाचित तलाठी रावेर तहसिल कार्यालयात रुजू झाले आहे.

Protected Content