Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेमुदत संपात धानाजी नाना महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभर मेबुदत संप पुकारण्यात आला आहे. या अनुषंगाने येथील धनाजी नाना महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील बेमुदत संपात सहभाग नोंदवून पाठींबा दिला आहे. तर प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

 

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे मात्र ह्या देशात नागरिकांसाठी व लोकप्रतिनिधींसाठी वेगवेगळे कायदे आहेत काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. एकीकडे लोकप्रतिनिधी असलेले आमदार यांना एकदा निवडून आल्यानंतर भरघोस पगार, सुख सुविधा, मोफत प्रवास, मोफत फोन बिल, यासह एकदा निवडून आल्यावर  विधिमंडळात दोन मिनिटात मंजूर झालेले भरघोस पेन्शन  आणि दुसरीकडे राज्य शासकीय कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी वेळोवेळी संप पुकारावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना उमटत आहे.

 

फैजपूर धनाजी नाना महाविद्यालयातील कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत  संपात  असून त्यांनी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांना निवेदन दिले. निवेदनात शासनाच्या आड मुठ्या धोरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांना संप करावा लागत आहे. कर्मचारी यांच्या मागण्या रास्त असतांना त्रास देण्याचे  धोरण शासन करीत आहे. आमच्या मागण्या आश्वासित प्रगती योजनेचा जीआर पुनर्जीवीत करणे, सातव्या वेतन आयोगाचा फरक व ५७ महिन्याची थकबाकी देणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, नोकर भरती करणे या विषयांचे निवेदन देण्यात आले आहे.

 

प्रांत कार्यालयातील  एस बी तडवी अव्वल कारकून, ज्योती सुरवाडे अव्वल कारकून, ए व्ही चौधरी महसूल सहाय्यक, कृष्णा रमेश लाल माळी वाहन चालक, जगदीश पवार शिपाई, योगेश केदारे शिपाई  हे कर्मचारी जुनी पेन्शन व प्रमुख इतर  प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर गेलेले आहेत. मंडळ अधिकारी एम एच तडवी, तलाठी तेजस पाटील हे सुद्धा संपावर आहेत. प्रांताधिकारी कैलास कडलग यांचा संपात सहभाग नाही. त्यांनी दुपारी दर मंगळवारी सुरू असलेल्या  महसूल नोंदीच्या केसेस  यांची सुनावणी घेण्यात आली.

Exit mobile version