बेकायदेशीर सभा रद्द झाली : भगत बालाणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेची आज विशेष महासभा ही भाजपच्या गटनेत्यांना विश्‍वासात न घेता आयोजीत करण्यात आल्याने ती बेकायदेशीर होती. आमच्या सदस्यांनी ही सभा रद्द करण्याची मागणी लाऊन धरल्याने सभा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी दिली.

 

 

भगत बालाणी यांनी पुढे सांगितले की,   काल महापौर व आयुक्त यांना नाशिक विभागीय आयुक्त यांचे भाजपचे अधिकृत गटनेते म्हणून भगत बालाणी यांच्या नावाची नोंद आहे. ही माहिती आम्ही माहितीच्या अधिकारात मागविली आहे. आमचा स्वीकृत नगरसेवक पदाच्या उमेदवारी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला वा पक्षाला आमचा विरोध नाही. परंतु, महासभेच्या आदल्या दिवशी महापौर हे सर्वपक्षीय गट नेत्यांना बोलवून तैलीनिक संख्येनुसार ते नाव मागवितात. मात्र, या बैठकीला भाजपच्या गटनेत्यांना बोलविण्यात आले नसल्याने ही बेकायदेशीर सभा होती त्यामुळे ही सभा तहकूब करण्यात यावी अशी मागणी होती. आमच्या मागणीला महापौर जयश्री महाजन व नितीन लढ्ढा यांनी मान देऊन सभा तहकूब केल्याने भाजप त्यांचे आभारी आहोत. यापुढे सर्व विषय नियमाने घेण्यात येतील अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आम्ही कोणताही गोंधळ घातला नसल्याचा भगत बालाणी स्पष्ट केले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/962775727608616

 

Protected Content