Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बेकायदेशीर दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर- सिमा झावरे (व्हिडीओ)

जळगाव सचिन गोसावी । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून येणारे अवैध आणि बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि बनावट दारूची विक्री होणार नाही, याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष लागून आहे, अशी माहिती अधिक्षक सिमा झावरे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले.

लॉकडाऊन काळात जिल्ह्यात दारू विक्रीचे लायसन्स बंद होते. बेकायदेशीर दारूची वाहतूक करून मोठ्या प्रमाणावर होत होती. या काळात बेकायदेशीर दारूची विक्री होत असतांना कमी मनुष्यबळाच्या मदतीने कारवाई करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आहे. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळात सर्व दुकाने दोन ते तीन महिने पुर्णपणे बंद होती. यात दारू विक्रीचा देखील समावेश होता. इतर राज्यातून आणि जिल्ह्यातून होणारी देशी विदेशी आणि हातभट्टीची दारूची वाहतूक होत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकून कारवाई करण्यात आले आहेत. दरम्यान काही दिवसांनंतर लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरूवात झाली. लायसन्स धारकांना दारूची विक्री करण्यास नियमांच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली. यात सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन सक्तिचे करण्यात आले होते. आता हळूहळू जनजीवन पुर्वपदावर आले आहे. दरम्यान, आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देखील परराज्यातून बेकायदेशीर दारूची वाहतूक आणि विक्री होवू शकते यासाठी जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग सतर्क आहे. नागरीकांना आवाहन आहे की, तुमच्या परिसरात असे बेकायदेशीर दारूची विक्री होत असल्यास तत्काळ पोलीसांना कळवावे असे आवाहन अधिक्षिका सिमा झावरे यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्यूजच्या माध्यमातून केले आहे.

 

Exit mobile version