Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बॅन्ड व्यावसायिक, वाजंत्री कलाकारांवर उपासमारीची वेळ; मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असून परिस्थिती गंभीर आहे व यापुढे ही राहणार आहे, अशा स्थितीत बॅन्ड व्यावसायिक व हातावर पोट असणाऱ्या वाजंत्री कलाकारांवर उपसमारीची वेळ आली असून त्यांना शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणीचे निवेदन बॅन्ड मालक व वाजंत्री कलाकारांचे हितचिंतक सुरेन सुरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २३ मार्च २०२० या तारखेपासूनपुढे असलेले लग्न समारंभासह विविध कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. अश्या स्थितीत बॅन्ड व्यावसायिकांची व बॅन्ड वाजंत्री कलाकारांची स्थिती बिकट झालेली आहे. बॅन्ड मालकांकडे लग्न समारंभ करणाºयांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलेले होते़ यामुळे बॅन्ड मालकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. एक-एका बॅन्ड व्यावसायिकांकडे २० पेक्षा जास्त बॅन्ड वाजंत्री कलाकार आहेत तर महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येने बॅन्ड व्यावसायिक असून लाखोंच्या संख्येत बॅन्ड वाजंत्री कलाकार आहेत. बॅन्ड व्यावसायिक व वाजंत्री कलाकार यांचे पूर्ण वर्षभराचे बजेट हे बॅन्डवर अवलंबून असते. त्यामुळे सद्यस्थितीत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, अशा स्थितीत शासनाने अन्य घटकांप्रमाणे या बॅन्ड व्यावसायिक व कलाकारांना मदत करावी, असे सुरेन सुरवाडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Exit mobile version