Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बॅग कापून पैश्यांचे बंडल चोरून नेणाऱ्या दोन्ही महिलांना पकडले !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका बँकेच्या गेटजवळ एकाच्या बॅगेला धारदार वस्तूने कापून ५० हजार रूपयांचे बंडल चोरून नेतांना दोन महिलांना पकडले आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नरेंद्र पंडीत भोळे (वय-४८) रा. खडका ता. भुसावळ यांचे ग्राहक सेवा केंद्र दुकान आहे. गुरूवार १ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील बँक ऑफ बडोदा च्या गेटजवळ असताना दोन अनोळखी महिला आल्या. त्यांनी हातात धारदार वस्तूने नरेंद्र भोळे यांची बॅगेला लावून आत ठेवलेले ५० हजाराचे बंडल चोरून नेत असतांना नरेंद्र भोळे यांच्या लक्षात आले. त्यांनी दोन्ही महिलांचा पठलाग करून पकडले. त्यांच्याकडून ५० हजाराची रोकड हस्तगत केली. दरम्यान, दोन्ही महिलांना भुसावळ बाजार पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. दोघांची नावे विचारले असता अनिता संजय सिसोदिया (वय-३३) रा. कडीया नरसिंगड, जि. राजगड (मध्यप्रदेश) आणि ललीता शाका सिसोदिया (वय-२५) रा. धुतखेडी नरसिंगगड रा. राजगड (मध्यप्रदेश) असे नावे सांगितली. त्यानुसार नरेंद्र भोळे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक तेजस परिसकर करीत आहे.

Exit mobile version