Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी करत छळ

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील विवाहितेला बुलेट गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी करत मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सोमवारी ३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील माहेर असलेल्या भावना चंद्रकांत पाटील यांचा विवाह जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील चंद्रकांत रमेश पाटील यांच्याशी झालेला आहे. लग्नानंतर पती चंद्रकांत पाटील हा काहीही ना काही कारणावरून महिलेला टोचून बोलणे सुरू केले. त्यानंतर काही दिवसांनी विवाहितेला माहेरहून बुलेट गाडी घेण्यासाठी माहेरहून २ लाख रूपयांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू आणि सासरे यांनी अंगावरील श्रीधन काढून घेत माहेरी पाठवून दिले. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने सोमवारी ३ जूलै रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानंतर पती चंद्रकांत रमेश पाटील, सासरे रमेश माधव पाटील, सासू उषाबाई रमेश पाटील सर्व रा. कुसुंबा ता.जि.जळगाव यांच्याविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील करीत आहे.

Exit mobile version