Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलढाण्यात उद्या धडकणार शेतकऱ्यांचे वादळ 

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या रविवारी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा निघणार आहे. जिल्हाभरातील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी शहरातील वाहतूक वळविण्याचे आदेश जारी केले असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे तर दुसरीकडे पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली आहे. चोख बंदोबस्त, वाहतूक नियोजनाची संपूर्ण तयारी केली आहे.

दरम्यान आज सकाळी रविकांत तुपकर व उपविभागीय पोलीस अधीक्षक सचिन कदम, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रल्हाद काटकर तसेच डीबी पथक व पोलीस कर्मचारी यांनी मोर्चाचा मार्ग व सभास्थळाची पाहणी केली. गेल्या वर्षी मोर्चानंतर राज्यभर आंदोलन पेटले होते. यावर्षी आता रविकांत तुपकर एल्गार मोर्चात कोणती भूमिका घेतात. पुढील आंदोलनाबाबत काय घोषणा करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Exit mobile version