Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलडाण्यात ऑक्सिजन जनरेशन प्लांट कार्यान्वित..

 

 

बुलडाणा : प्रतिनिधी । उदघाटनाची औपचारिकता टाळून आज बुलडाणा येथील महिला रुग्णालयात उभारण्यात आलेला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे जाहीर केले

 

कोरोनाने हैराण केले असतांना ऑक्सिजन तुटवड्यावर निदान म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात ठिकठिकाणी उभारण्यात येत आहेत. आज १५ मे रोजी येथील स्त्री रुग्णालय (समर्पित जिल्हा कोविड रुग्णालयात ) ऑक्सिजन जनरेशन प्लांट चेे ना. डॉ. शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन ठेवण्यात आले होते, परंतु प्रसिद्धीपासून नेहमीच दूर राहणाऱ्या  पालकमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाची  औपचारिकता  रद्द करत फक्त पाहणी करून सदर प्लांट कार्यान्वित झाला असल्याची घोषणा केली.

 

जिल्ह्याला दररोज जवळपास १६ मे.टन ऑक्सिजन लागतो. आता या प्लांट व्दारे  ८० जम्बो सिलींडर हवेतील ऑक्सिजन २४ तासात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे सिलिंडरचा वापर न करता, थेट प्लांटपासून रुग्णांच्या बेडला ऑक्सिजन पाइपलाईन अटॅच करुन रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यात येईल. देऊळगावराजा, खामगाव, मलकापूर व इतरही ठिकाणी प्लांट लवकरच उभारण्यात येणार आहे. तिसऱ्या कोरोना लाटेच्या शक्यतेमुळे राज्य स्वंयपूर्ण होत असतांना बुलडाणा जिल्हा देखील सर्वार्थाने स्वंयपूर्ण करणार असल्याचा विश्वास अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला.

 

Exit mobile version