Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलडाणा जिल्ह्यात कृषी सेवाकेंद्रे द्र ९ ते ३ पर्यंत सुरू राहणार

 

बुलडाणा : प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, कृषी निगडित दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा राहणार आहे.

 

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ जून २०२१ पर्यंत  सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत  सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या आदेशात अंशत : बदल करण्यात आला आहे.

 

या वेळे व्यतिरिक्त सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तू दुकाने, किराणा,स्वस्त धान्य दुकाने,  भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने यांना घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी ७ ते सायं ७ पर्यंत मुभा देण्यात येत आहे.  दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री सकाळी ६ ते सकाळी ९ आणि सायं ६ ते रात्री ८ सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरपोच दूध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामुर्ती यांनी दिले आहेत.

Exit mobile version