बी.जे. मार्केटमधील इलेक्ट्रिक दुकान फोडले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीन बी.जे. मार्केटमधील इलेक्ट्रिक दुकान फोडून २० हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, मेहरुण परिसरातील रहिवासी खालीद जब्बार पिंजारी वय ३० यांचे नवीन बी.जे. मार्केटमध्ये आर.के.इलेक्ट्रीकल्स व रिवाईडिंग वर्कस् नावाने दुकान आहे. या दुकानात जुन्या वस्तू दुरूस्तीच कामे केली जातात. खालीद पिंजारी यांच्या सोबत त्यांचे मामा शकील पिंजारी हे सुध्दा काम करतात. रोज सकाळी साडेआठ ते रात्री आठ या वेळेत दुकानात काम चालते.  सोमवारी सकाळी साडे आठ वाजता शकील पिंजारी हे दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाचे कुलूप गायब तर दुकान उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. पाहणी केली असता, दुकानात दुरूस्तीसाठी आलेले ७ पंखे, ३ पाण्याच्या मोटारी यासह बायडिंग वायर बंडल व १० किलो भंगार असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content