बीएसएनएल कार्यालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यालया समोरील पार्किंग झोनमधून तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सुंदरलाल छाजेड (वय-३२, रा. रामबाग कॉलनी, लॉ कॉलेज समोर, जळगाव) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. स्टाईलचे दुकान लावून आपला उदरनिर्वाह करत असतो. बुधवार १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हेमंत छाजेड हा त्याची दुचाकी (एमएच १९ एएल ५८११) ने जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळ कामाच्या निमित्ताने आलेला होता. त्यावेळी त्याने बीएसएनएल कार्यालयाच्या आवारात असलेल्या पार्कींग झोनमध्ये दुचाकी पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला लावलेली १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हेमंत छाजेड दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. हेमंत छाजेड यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरुवार १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी करीत आहे.

 

Protected Content