Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बीएसएनएलच्या बिकट परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार – आंदोलकांचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | बीएसएनएलच्या आजच्या बिकट  परीस्थीतीला कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले  जात आहे.  मात्र, या परिस्थितीस केंद्र सरकारचे धोरण जबाबदर असल्याचा आरोप करत देशभरातील सर्व  बीएसएनएल कर्मचाऱ्यांप्रमाणे जळगावातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फीती लावुन  या धोरणाविरोधात निदर्शन आंदोलन केले.

 

बीएसएनएलच्या बिकट परिस्थितीला केंद सरकारचे कार्पोरेट धार्जीने धोरण व बीएसएनएल प्रशासनाचा ढीसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप  बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनद्वारे करण्यात आला आहे. सरकारने बीएसएनएल सरकारी कंपनी  असुनही आजपर्यंत बीएसएनएलला समान न्याय दिलेला नसून  कायम खाजगी दुरसंचार कंपन्यांना प्राधान्य देवुन बीएसएनएल स्पर्धेत कशी मागे राहील हेच धोरण कायम ठेवलेले आहे.  सरकारने खाजगी दुरसंचार कंपन्यांना सर्वप्रथम २ जी , ३  जी , ४जी अ तंत्रज्ञानाच्या परवानग्या दिल्या. खाजगी कंपन्यांनी २०१२ मध्येच  ४जी सुरू केले आता खाजगी दुरसंचार कंपन्या  ५जी चा धंदा सुरू करीत असतांना अजुनपर्यंत बीएसएनएलला साधी ४जी सेवा सुरू करण्याची मुभा ‘दिलेली नाही म्हणुनच २००८, २००५ पर्यंत नफ्यात असणारी बीएसएनएल आज तोटयात आलेली आहे. सरकारने BSNL REVIVAL PLAN अंतर्गत ३१.०१.२०२० रोजी ८० हजार कर्मचार्यांना VRS च्या माध्यमातुन कमी केले व त्वरीत बीएसएनएल ची जी सेवा सुरू करून कंपनीला फायदयात आणण्याचे आश्वासन दिले, परंतु आजपर्यंत सरकारने कुठलीही हालचाल केलेली नसुन आता हे सरकार परत दुसरा BSNL REVIVAL PLAN आणत असुन परत ३५ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा डाव आखला जात आहे व बीएसएनएल च्या आजच्या बीकट परीस्थीतीला कर्मचार्यांांना जबाबदार धरले जात आहे याचा निषेध म्हणुन देशव्यापी आंदोलनाची सुरुवात आज काळया फीती लावुन निदर्शने करून करण्यात आली. आंदोलनात जिल्हा सचिव कॉग्रेड निलेश काळे, सी. डी पाटील, शशिकांत सोनवणे, शालिक पाटील, प्रदिप चांगरे, विलास डकिडा, अकिल शेख, जे. पी शिंद, विकास बोंडे, अनिल धांडे, मीरा महाजन, आशा पाटील, सुनिता चौधरी, किर्तीमालिनी वैद्द आदी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 

 

Exit mobile version