Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बीएसएनएलच्या कार्यालयात चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्ती नगरात बीएसएनएल ऑफीसमधून ५० हजारांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, ३ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील निवृत्ती नगरात बीएसएनएलचे ऑफिस आहे. या ऑफिसमधून ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबरच्या काळात ऑफिसच्या जिन्याचा लोखंडी ग्रीलतसेच ग्रीला लावलेल्या कुलूपाची चैन तोडून एक्सचेंज रॅकमध्ये ठेवलेले जुने भंगारात काढलेले ओसीबी एक्सचेज इलेक्ट्रॉनिक कार्ड अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेले. घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी उपविभागीय अभियंता सुभान नादर पिंजारी वय ५० यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तुषार गावरे हे करीत आहेत.

Exit mobile version