Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बीएचआरच्या अवसायकांच्या घरावर छापा; निवासस्थानाची झाडाझडती

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील बीएचआर मल्टी-स्टेट सहकारी बँकेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या घरावर आज आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे.

शिवाजीनगर भागात जितेंद्र कंडारे यांचे घर असून आज सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे. ही तपासणी नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात येत आहे याची माहिती मात्र अद्याप देण्यात आलेली नाही. आज पहाटेपासून बीएचआर संबधित व्यक्तींच्या घरी छापा टाकला आहे. समता नगरातही पोलीसांच्या बंदोबस्तात पथक ठाण मांडून आहेत. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version