Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिल गेट्स यांनी खरेदी केले ४६०० कोटींचे अलिशान जहाज

Bill gate ship

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जागतिक स्थरावर श्रीमंत असलेले बिल गेट्स यांनी सुपर यॉट जहाज खरेदी केले आहे. या जहाजाचे वैशिष्ट्ये म्हणजे हे लिक्विड हायड्रोजनवर चालते. या जहाजाची किंमत तब्बल ४ हजार ६०० कोटी रुपये इतकी आहे. सुट्टी घालवण्यासाठी बिल गेट्स यांनी हे जहाज खरेदी केले आहे.

जवळपास ३७० फूट लांब असलेल्या अॅक्वा जहाजात पाच डेक आहेत. यात १४ पाहुणे आणि ३१ क्रू मेंबर, एक जिम, एक योगा स्टुडिओ, ब्युटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंग पूल बनवण्यात आले आहेत. या जहाजात २८ टनाचे दोन व्हॅक्युम सील्ड टँक लावण्यात आले. ते मायनस २५३ ड्रिग्री सेल्सिअसच्या तापमानावर उर्जा देण्यासाठी हायड्रोजन भरले जाऊ शकते. सुट्टी घालवण्यासाठी या आधी ते भाड्याने जहाज घेत होते.

बिल गेट्स यांचे नवीन जहाज हे २०२४ पर्यंत तयार होऊ शकते. हायड्रोजन होणार असल्याने ते केवळ पाण्याचे उत्सर्जन करेल. आणि इको फ्रेंडली असणार आहे. जहाजाच्या मागे सनबाथ किंवा स्विमिंग साठी एक लोअर लाँज एरिया दिला आहे. तर वरच्या बाजुला आउटडोल डायनिंग साठी इंटरनेटिंग स्पेस दिला आहे. जहाजात रात्री थंडी वाजू नये किंवा खोली गरम करण्यासाठी कोळसा किंवा लाकडाचा वापर करण्यात येणार नाही. तर जेल फ्युल्ड फायर बॉल्सचा वापर करण्यात येणार आहे.

Exit mobile version