Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिलवाडी येथील मुलीवर अत्याचाराच्या विरोधात निवेदन (व्हिडिओ)

पाचोरा, प्रतिनिधी । बिलवाडी येथील चर्मकार समाजाच्या मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार व अत्याचाराच्या विरोधात पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले आहे की, चर्मकार समाज पाचोरा तालुका व शहर तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघ पाचोरा तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने बिलवाडी ता. जामनेर येथील मुलीवर लैंगिक शोषण करून तिच्यावर बलात्कार व अत्याचार केल्याप्रकरणी सहा आरोपींना पोलीस प्रशासनाने अटक करून त्यांना पोस्को अंतर्गत तसेच दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला असून याबाबत दि. २६ रोजी पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना निवेदन देण्यात आले असून त्यात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, पीडित कुटुंबातील व्यक्तींना पोलिस संरक्षण मिळाले पाहिजे. तसेच पीडित कुटुंबास शासनाकडून आर्थिक साहाय्य मिळाले पाहिजे. याबाबत निवेदन तालुक्यातील चर्मकार समाजाचे जेष्ठ नेते व राष्ट्रीय चर्मकार महासंघ जळगाव जिल्हा जिल्हासंघटक अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्य शिक्षक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तालुका सचिव उमेश सोनवणे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष बी. बी. मोरे, कर्मचारी आघाडी शहराध्यक्ष प्रकाश रोझतकर, युवा आघाडी तालुकाउपाध्यक्ष नितीन बेंडाळे, गाळण येथील सरपंच राजेंद्र सावंत उपस्थित होते.

Exit mobile version