Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन

यावल  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतीनिधी |  तालुक्यातील किनगाव डोणगाव रोडवरील इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूल येथे  जननायक विर बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधुन आदिवासी वेषभुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

 

जननायक विर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने स्कुलच्या परिसरात आयोजीत या कार्यक्रमात  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येवुन त्यांना आभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आदिवासी बांधवांचे  वस्त्र परिधान करून पारंपारीक नृत्य सादर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील होते तर उप प्राचार्य राजश्री सुभाष अहिरराव या ही उपस्थीत होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आदिवासी वेषभुषा,आदिवासी बोलीभाषा तसेच आदिवासी गितांनवर नृत्य सादर करत आपल्यात असलेल्या कला सादर केली.  या कार्येक्रमाचे सुत्रसंचालन हर्षल मोरे  यांनी केले तर  आभार अनिल बारेला यांनी मानले.यशस्वीतेसाठी स्कुलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.

 

Exit mobile version