Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बिनविरोध ग्रामपंचायतींना २१ लाखांचा निधी – आ. सावकारे

 

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील ज्या गावांमध्ये बिनविरोध निवडणूक होईल त्या ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी २१ लाख रूपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार संजय सावकारे यांनी केली आहे.

गावातील विकास कामांसाठी बिनविरोध निवड झालेल्या गावांना अतिक्ति निधी देण्यात यावा या मागणीचे निवेदन आमदार संजय सावकारे यांना सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील व पंचायत समितीचे माजी उपसभापती मुरलीधर पाटील यांनी दिले होते.

या अनुषंगाने बिनविरोध निवडीमुळे गावांमध्ये सामाजिक एकोपा राखला जाईल तसेच विकास कामांना चालना मिळू शकते. यासाठी आमदार सावकारे यांनी बिनविरोध निवड होणार्‍या ग्रामपंचायतीला २१ लाख रुपये निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Exit mobile version