Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाळासाहेबांच्या स्मारकाला १०० कोटींचा निधी

मुंबई प्रतिनिधी । दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रूपयांचा निधी देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिनांक २३ जानेवारी रोज आहे. या आधी त्यांच्या स्मारकासाठी आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत १०० कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. बाळासाहेबांच्या जयंतीलाच या स्मारकाच्या कामास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version