Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बालमोहन विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा

चोपडा प्रतिनिधी। येथील बालमोहन विद्यालयात मराठी राज भाषा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अमर संस्थेचे व्यवस्थापक मुकेश चौधरी उपस्थित होते . ज्येष्ठ कवी , लेखक , नाटककार , साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

माझ्या मराठी मातीचा ,ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा.
हिच्या कुशीत जन्मले, काळे कणखर हात.
ज्यांच्या दुर्दम धिराने , केली मृत्युवरी मात.

कवी कुसुमाग्रजांनी सदरच्या कवितेतुन मराठी भाषेची महिमा आपणास सांगितलेली आहे. महाराष्ट्रात  राज्य भाषेचा दर्जा मराठीला आहे . मराठी जेवढी सोपी वाटते तेवढी सोपी नाही , एका शब्दाचे अनेक अर्थ निघत असतात . महाराष्ट्रात परकियांनी येवून मराठीची वाट लावली . इतर भाषेचे शब्द मराठीत अंतर्भूत झालेत सरळ मराठी  वेडीवाकडी  झाली. असे मार्गदर्शन विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक विकास डिगंबर गोहिल यांनी केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक प्रदीप चौधरी उपशिक्षक मयुरेश्वर सोनवणे,विनोद जोहरी, सागर तायडे , सोनाली साळुंखे , योगिता बाविस्कर उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रकांत पाटील तर आभार राकेश महाजन यांनी मानले.

Exit mobile version