बालकांची बौद्धिक आणि प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन महाशिबिराच आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  ज्या देशातील बालकांची बौद्धिक आकलनशक्ती,रोगप्रतिकारक  शक्ती चांगली राहील तोच भविष्यातील तरुण देशाची शक्ती बनेल हेच लक्षात घेऊन सरकारने बालकांची बौद्धिक आकलनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून उत्तम आरोग्य आणि बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आज जळगांव जिल्ह्या शासकीय आयुर्वेद रुग्णालय मोहाडी जळगांव मार्फत जळगावातील जिजाऊ नगर, समता नगर आणि शिरसोली येथील जिल्हा परिषद शाळेत सुवर्णप्राशन महाशिबिर आयोजित करण्यात आले होते.

 

आयुर्वेदानुसार प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर अश्या प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून जळगाव शहर व परिसरातील बालकांची   प्रतिकारशक्ती वाढवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी  कार्य केले जाईल, असा मानस प्रभारी अधिष्ठाता डॉ. अभिजित अहिरे ह्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या शिबिरानंतर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय  रुग्णालय, महिला रुग्णालय परिसर, मोहाडी रोड, जळगाव येथील बालरोग ओपीडी मध्ये सुवर्ण प्राशन नियमितपणे उपलब्ध राहील अशी माहिती ही त्यांनी दिली.

 

या महाशिबिरात शुन्य ते 10 वयोगटातील 526 बालकांनी सुवर्णप्राशन शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे आयोजन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.रामन घुंगराळेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागप्रमुख डॉ प्रशांत पाटील डॉ.बबिता मंडल, डॉ चेतनकुमार पाटील, डॉ काटे, डॉ सना शेख, डॉ रवींद्र पांढरे, डॉ रेवती गर्गे यांनी केले तसेच समता नगर,जिजाऊ नगर,शिरसोली येथील ग्रामस्थ यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Protected Content