Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बारावी बोर्ड परीक्षा : सोमवारपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार

 

पुणे ,वृत्तसंस्था । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून २३ नोव्हेंबरपासून राज्यातील ग्रामीण भागातील ९ ते १२ वी शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली आहे. यात २०२१ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवारी म्हणजेच १५ डिसेंबरपासून ऑनलाइन अर्ज करता येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे इथून ऑनलाइन पत्रक जारी करण्यात आलं आहे.

राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पत्रकानुसार नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले विद्यार्थी सरल डेटा बेस वरून १५ डिसेंबर ते ४ जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम घेतलेले विद्यार्थी ५ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान अर्ज भरू शकणार आहेत. मात्र, परीक्षा कधी आणि कशा घेणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही

ऑनलाइन भरायचा अर्ज
www.mahahssc board.in या संकेतस्थळावर जाऊन तिथे आपण इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरू शकणार आहात. तिथे आपलं नाव, वैयक्तीक माहिती आणि विषय इत्यादी माहिती भरायची आहे. हा फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून लॉगइनमधून प्री लिस्ट दिली जाणार आ़हे. या प्रीलिस्टची प्रिंट काढून त्यावर विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करावी आणि महाविद्यालयाकडे जमा करावी.

या संबंधीची अधिक तपशील www.mahahssc board.in या संकेतस्थळावर HSC एप्रिल-मे ऑनलाइन अॅप्लिकेशन इथे उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थी आणि पालकांनी ते नीट वाचून भरावेत. कोरोनाच्या संसर्गामुळे अजूनही १०० टक्के शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यात आली नसली तरी ऑनलाइन माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. जानेवारीमध्ये महाविद्यालयं १०० टक्के सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा कधी जाहीर होणार परीक्षा ऑनलाइन होणार की लेखी याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Exit mobile version