Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बामणोद शिवारात जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; ८ जणांवर गुन्हा

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद शिवारात असलेल्या सून सावखेडा मारुती मंदिराजवळील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर फैजपूर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री धाड टाकून आठ जुगारींना ताब्यात घेत त्यांच्या कडून रोकड, महागगडी चार चाकी व बुलेटसह 5 मोटार सायकली असा एकूण 9 लाख 13 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या आरोपींविरुद्ध आधीच कोरोना आजारामुळे संचारबंदी लागू असल्याने संचारबंदीचे उल्लंघन तसेच मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल व जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बामनोद शिवारातील विनोद पाटील यांच्या शेतातील फार्महाऊसच्या बाजूला जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे गुप्त माहिती मिळाल्यावरून सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ.विजय पाचपोळ, स.फौ.अंबादास पाठरवड, पोहेकॉ उमेश पाटील, उमेश चौधरी व प्रशांत चिरमाडे यांनी गुरुवारी रात्री जुगार अड्डयावर धाड घातली. या धाडीत ८ जुगारींना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यात विनोद प्रभाकर पाटील रा. भुसावळ, सैय्यद वाहिद सैय्यद रशीद रा. भालोद, ब्रिजलाल राजाराम कोळी रा. म्हैसवाडी, अजय आनंदा भोई रा.भालोद, संजय उर्फ जॉकी तुकाराम सोनवणे रा.बामणोद, लिलाधर गंभीर कोळी, अनिल रामा कोळी, मंगल छगन पाटील, सर्व रा म्हैसवाडी यांचा समावेश होता. या आरोपींकडून रोख रक्कम, एक महागडी चार चाकी, पाच दुचाकी, मोबाईल असा एकूण 9 लाख 13 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. पो कॉ उमेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार अंबादास पाठरवड करीत आहे.

Exit mobile version