Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाबा रामदेवांच्या औषधाला आयएमएचा विरोध

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । योगगुरू बाबा रामदेव यांनी लाँच केलेल्या कोरोनील या औषधीला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध दर्शविला आहे.

पतंजली कंपनीने बाजारपेठेत आणलेल्या कोरोनील औषधाला  इंडियन मेडिकल असोसिएशनकडून विरोध करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी हे औषध लाँच केले होते. यावेळी त्यांनी पतंजलीचा वैज्ञानिक रिसर्च पेपरही सादर केला होता. मात्र, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव जयेश लेले यांनी या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांवरही टीका केली आहे.  या औषधाला कुठल्याच यंत्रणांकडून परवानगी मिळाली नसल्याचे जयेश लेले यांनी स्पष्ट केले. 

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन पतंजलीच्या औषधाला चुकीच्या पद्धतीने प्रमोट करत आहेत. या औषधाला डीसीजीआय किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे डॉ. हर्षवर्धन यांची ही कृती मानवतेला काळीमा फासणारी आहे, असे जयेश लेले यांनी म्हटले आहे.

 

 

Exit mobile version