बाबा नमकीन कंपनीसमोर अनोळखी मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा नमकीन कंपनीसमोर अंदाजे ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस ठाण्याच्या हद्दतील के सेक्टर मधील बाबा नमकीन कंपनीसमोर शुक्रवारी १२ मे रोजी दुपारच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात स्थानिक नागरीकांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अतुल वंजारी आणि रविंद्र पाटील यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. दरम्यान, मयताची ओळख अद्यापपर्यंत पटलेली नाही. मयताची ओळख पटल्यास एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल पाटील हे करीत आहे.

Protected Content