बाबासाहेबांच्या निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : रिपाई आठवले गटाची मागणी

यावल, प्रतिनिधी । भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील निवासस्थान राजगृहाची करण्यात आलेल्या तोडफोडीच्या निषेधार्थ येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात येऊन या घटनेस जबाबदार समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात यावल येथील तहसील कार्यालयात येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने दिनांक ७ जुलै रोजी काही मनुवादी समाजकंटकांच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या बंगल्याची तोडफोड करण्यात आली आहे. या अत्यंत निषेधार्थ घटनेला जबाबदार विघ्नसंतोषी मनुवादी विचारसरणीची मंडळीच जबाबदार असून या घटनेचे सर्व आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ प ऑफ इंडिया आठवले गटाचे यावल शहराध्यक्ष विष्णू टीकाराम पारधे यांच्यावतीने यावर्षी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले. याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे हितेंद्र सुभान गजरे, राजेश सुरवाडे, गौतम भिमराव गजरे, अविनाश रमेश तायडे, यश विजय अडकमोल, अविनाश रमेश तायडे, बाळा इंगळे, आकाश पांडुरंग शिंदे, सोपान नागराज इंगळे, बाळू भिमराव गजरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content