Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाबरी विध्वंस खटल्याचा आज निकाल

अयोध्या वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीदीचा विध्वंस खटल्यात सीबीआय विशेष न्यायालय आज आपला निकाल जाहीर करणार आहे. यासाठी सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. एकूण ४९ आरोपी आहेत. या आरोपींविरोधात सुनावणी झाली.४९ आरोपींपैकी एकूण १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे.

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारतीसारखे मोठे नेते आरोपी आहेत. लखनऊमध्ये चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकले. साक्षी तपासल्या. १ सप्टेंबरला सुनावणी पूर्ण केली. २ सप्टेंबर पासून निकालाचे लिखाण सुरू केले.

लालकृष्ण आडवाणी , मुरली मनोहर जोशी, महंत नृत्यगोपाल दास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती, धरम दास, सतीश प्रधान, चंपत राय, पवनकुमार पांडेय, ब्रजभूषण सिंह, जयभगवान गोयल, महाराज स्वामी साक्षी, रामचंद्र खत्री, अमननाथ गोयल, संतोष दुबे, प्रकाश, शर्मा, जयभान सिंह पवेया, विनय कुमार राय, लल्लू सिंह, ओमप्रकाश पांडेय, कमलेश त्रिपाठी उर्फ सती दुबे, गांधी यादव, धर्मेंद्रसिंह गुर्जर, रामजी गुप्ता, विजयबहादुर सिंह, नवीनभाई शुक्ला, आचार्य धर्मेंद्र देव, सुधीर कक्कड, रविंद्रनाथ श्रीवास्तव हे या खटल्यातील आरोपी आहेत .

Exit mobile version