Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाबरी जिंदा है : असदुद्दीन ओवेसी

हैदराबाद (वृत्तसंस्था) बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. बाबरी जिंदा है, असे ट्वीट एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे.

 

असदुद्दीन ओवेसींनी आज बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केले आहे. बाबरी मशीद ही तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहील. बाबरी जिंदा है, असे ओवेसींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, यायाधीही देखील ओवेसी यांनी बाबरी मस्जीद ही मशिद असून ती कायम राहणार, ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा इतर कुणीही पळ काढू शकत नाही. आम्ही नव्या पिढीला सांगतच राहू की, आपली मस्जीद पाडलीय. असुदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचे उल्लंघन असल्याचे काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

Exit mobile version