Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बापाकडून मुलीच्या बलात्काराचा बदला, एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या

 

 

 

अमरावती : ( आंध्र प्रदेश ) : वृत्तसंस्था । विशाखापट्टणम शहरात एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांची हत्या केली. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मुलीच्या बलात्काराचा बदला म्हणून कृत्य केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं

 

ही घटना  विशाखापट्टणम येथील जट्टादा गावात घडली . या गावातील एका व्यक्तीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा जीव घेतला. आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  आरोपीची सध्या चौकशी सुरु आहे

 

दोन्ही कुटुंबांमध्ये शत्रूत्व होतं. मृतक कुटुंबातील एका व्यक्तीने आरोपीच्या मुलीवर बलात्कार केला होता, असा दावा त्याने केला आहे. त्यातून त्याने इतक्या लोकांच्या हत्या केल्या, असं पोलिसांनी सांगितलं. ज्या व्यक्तीने बलात्कार केला होता तो सध्या फरार आहे. त्याने बलात्कार केल्याची माहिती आरोपीला कळताच त्याला प्रचंड संताप आला. त्याचा स्वत:वरील संयम सुटला आणि त्याने सहा जणांची हत्या केली.

 

ही घटना ज्या भागात घडली त्या भागात खळबळ उडाली आहे. आरोपीने लहान मुलांनाही न सोडल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केला जातोय. दरम्यान, आरोपीने ज्या धारधार शस्त्रांनी सहा जणांची हत्या केली ते शस्त्र जप्त केलं आहे.

 

आरोपीन दोन महिला, लहान मुलं आणि एका पुरुषाची निर्दयीपणे हत्या केली आहे.  त्यांचे मृतदेह  ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे.

Exit mobile version