बापरे… मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ, दुसरे लग्नही केले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेला मुलगा होत नाही म्हणून सासरच्या मंडळीकडून छळ करण्यात आला. एवढेच नाही विवाहितेला काही न सांगता पतीने दुसरे लग्न देखील उरकून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील दहिगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा मे २०१८ मध्ये एरडोल तालुक्यातील दिपक सुपडू पाटील याच्याशी रितीरिवाजानुसार विवाह झाला आहे. लग्न झाल्यापासुन सासरच्या मंडळीकडून तिला चांगली वागणुक मिळाली. पती दिपक पाटील पासून चार वर्षाची मुलगी आहे. पतीसह सासरे सुपडु दगा पाटील, सासु सुंनदा सुपडू पाटील , नंदण रेखा संभाजी पाटील, नणंद प्रियंका हिरालाल पाटील यांना मुलगा हवा असल्याने सर्व मंडळीकड्डन  मुलगी होईपर्यंत या मंडळींनी सोनाली पाटील हिला चांगली वागणुक दिली. मुलगी झाल्यावर तिला सासरच्या मंडळीकड्डन मानसिक, शारीरिक त्रास देत गांजपाट करू लागले.

 

दरम्यानच्या काळात सासरच्या मंडळीचा त्रास असहाय झाल्याने सोनाली ही माहेरी दहिगाव तालुका यावल येथे आली असता तिचा पती दिपक पाटील याने एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणारी एका महिलेशी लग्न केले. ही बाबत पहिल्या पत्नीपासून लपवून ठेवली होती. ही माहिती मिळाल्यानंतर विवाहितेच्या धक्काच बसला. तिने यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती दिपक सुपडू पाटील, सासू सुनंदा सुपडू पाटील, नंणद प्रियंका हिरालाल पाटील, नंणद रेखाबाई संभाजी पाटील, शारदा दिपक पाटील यांच्या विरूद्ध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉस्टेबल नरेन्द्र बागुले हे करीत आहे .

Protected Content