Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बापरे !… पारोळा तालुक्यातील एकाच गावातून दोन अल्पवयीन मुलींना पळविले

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना गावात राहणारा दोन जणांनी फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

 

पहिल्या फिर्यादीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावात राहणाऱ्या राहूल अशोक भिल याने ११ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारा पिडीत मुलीला फूस लावून पळवून नेत अपहरण केले. यासंदर्भात पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी राहूल भिल यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक प्रविण पारधी करीत आहे.

 

तर दुसऱ्या घटनेत त्याच गावात राहणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला धुळे जिल्ह्यातील मेहेरगाव येथील मयुर अर्जून भिल याने ११ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अल्पवयीनमुलीला काहीतरी आमिष दखवत तिला फूस लावून अपहरण केले आहे. अशी तक्रारी पिडीत मुलीच्या आजोबांनी दिली आहे. दिलेल्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मयुर भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किशोर पाटील करीत आहे.

Exit mobile version