Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बापरे… अवघ्या २४ तासांत कोरोनामुळे जगभरात अडीच हजार लोकांचा मृत्यू

लंडन (वृत्तसंस्था) अवघ्या २४ तासांत कोरोनाने जगभरात अडीच हजार लोकांचा बळी घेतलाय. तर ५० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. जगभरात कोरोनाचा कहर आणखी वाढला असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

 

जगभरात तब्बल १९७ देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत ५० हजार नवे रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. आजच्या घडीला जगभरात मृतांचा आकडा १९ हजारावर गेला आहे. जगभरातल्या मृतांची संख्या १९१०१ इतकी झाली आहे. २४ तासांत इटलीत ७४३ तर स्पेनमध्ये ६८० रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही संख्या दर तासाला वाढतच आहे. अमेरिकेत गेले दोन दिवस प्रतिदिन १०० हून अधिक बळी गेले होते. पण मंगळवारी एकाच दिवशी अमेरिकेत २२५ बळी गेले. त्यातल्या त्यात चांगली बातमी म्हणजे १ लाख ९ हजार रुग्ण बरे झाले आहेत.

Exit mobile version