Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बाजार समितीच्या सभापतीपदी पाटील यांची निवड ; कॉंग्रेसतर्फ सत्कार

44 1

यावल, प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेने जळगाव जिल्हा उपप्रमुख तुषार सांडुसिंग पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाच्याच्या वतीने त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले.

यावलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे तुषार उर्फ मुन्ना साडुंसिंग पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कादिर खान , यावल खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक शशिकांत गाजरे तसेच हिशोबनीस सुरेश यावलकर, पत्रकार भरत को कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक कृषिभूषण नारायण शशिकांत चौधरी, कृषी उत्पन्नाचे माजी उपसभापती राकेश वसंत फेगडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी कृषी उत्पन्नाचे नवनियुक्त सभापती तुषार पाटील यांचा तर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नारायण चौधरी यांचे प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत सत्कार केले.

Exit mobile version