Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांभोरी येथील कंपनीत ठेकेदाराचा अकस्मात मृत्यू

dead ..........

जळगाव प्रतिनिधी । कंपनी नास्ता करण्यासाठी जात असलेल्या ठेकेदारांचा चक्कर येवून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, सुनिल शेनफडून मार्कंडे (वय-५२) रा. यशवंत नगर हे बांभोरी येथील केबीएक्स कंपनीत ठेकेदारीचे काम पाहतात. आज नेहमीप्रमाणे सकाळची शिप्ट असल्याने सकाळी ६ वाजता कामावर निघून गेले. नास्ता करण्यासाठी ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास कॅन्टीनमध्ये जात असतांना त्यांना अचानक चक्कर येवून खाली पडले. त्यांना कामगारांनी खासगी वाहनाने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. विसपूते यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत सुनिल यांच्या पश्चात मुलगा मयूर, मुलगी धनश्री आणि पत्नी ज्योती असा परीवार आहे.

Exit mobile version