Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांभोरी खुर्द येथे आगळावेगळा हनुमान जन्मोत्सव साजरा

एरंडोल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  काळाराम मंदिरात दलीतांना प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केल्याचा इतिहास आहे, या पार्श्वभूमीवर प्रत्येक घटकाला सन्मान मिळावा अशा भुमिकेतून दि.१६रोजी बांभोरी खुर्द या गांवी हनुमान जन्मोत्सवाचा सर्व पुजाविधी दलीत व आदिवासी समाजातील तरुणांच्या हस्ते करण्यात येऊन तळागाळातील समाजाला मान प्रदान करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला

 

एरंडोल तालुक्यातील सर्वात लहान गाव बांभोरी खुर्द आहे,वनकोठा ग्रामपंचायत अंतर्गत या गावाची लोकसंख्या ३०० च्या जवळपास आहे, क्षत्रियांची फक्त ५घरे असून मोठ्या संख्येने आदिवासी भील्ल समाज आहे तर त्यांच्या खालोखाल दलीत समाज आहे.

 

या गावात ग्रामपंचायत कार्यालय नसून शासकीय जि.प.ची मराठी शाळा आहे,येथे राष्ट्रीय सणाला सरपंच अथवा कोणत्याही पदाधिकारीच्या हस्ते ध्वजारोहण न होता याच गावातील तळागाळातील मानसन्मान पासून उपेक्षित, महिला पुरुषांना हा मान दिला जातो,ही परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरु आहे, झेंडावंदन ज्यांच्या हातून झाले नाही, कदाचित असा व्यक्ती या गावात नसेल.

या गावात कोणती ही तंटामुक्ती समिती नाही, परंतू या गावातून पोलिस ठाण्यात आजतागायत एक ही तक्रार दाखल झालेली नाही. किरकोळ वाद गावातच मिटविले जातात.या गावात रोटेशन प्रमाणे जर एक प्रभाग झाला, तर त्या प्रभागात निवडणूक न होता गावकरी एकत्र बसून सर्वसंमतीने उमेदवार बिनविरोध निवड करतात. ह्या अतिशय लहान गांवात शेतमजूर, कष्टकरी लोकांचीच वस्ती असून देखील या गावात हनुमानाचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. यंदा हनुमान जयंतीच्या पुजाविधीचा मान गावातील नवतरुण दलीतवस्तीतील गोपाल खैरनार, आदिवासी वस्तीतील सुनील मोरे व राजपूत समाजाचे निलेश पाटील यांना देण्यात आला होता.

 

Exit mobile version