Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांबरुड (राणीचे) येथे स्व. ओंकार (अप्पा) वाघ अभिवादन सभा

पाचोरा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   माजी आमदार स्व. ओंकार (अप्पा) वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शक्तीस्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

 

बांबरूड (राणीचे) येथील माजी आमदार  स्व. ओंकार (अप्पा) वाघ यांच्या शक्तिस्थळावर सोमवारी दि. १७ आॅक्टोबर रोजी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांनी आप्पासाहेब बद्दल जीवन कार्याचा, समाजसेवेचा कार्याचा माहिती करून जुन्या आठवणींना उजळा दिला.  स्व. ओंकार आप्पांच्या शक्ती स्थळावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पूष्पांजली वाहून तसेच दीप प्रज्वलन करून अभिवादन केले. डॉ. लोहिया विद्यालयाच्या प्रांगणात अभिवादन सभा झाली. कृ. उ. बा. समिती प्रशासक व माजी आमदार दिलीप वाघ अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, दगाजी वाघ, नितीन तावडे, विनय जकातदार, प्रा. सुभाष तोतला, मधुकर पाटील, ललित वाघ, झुंबर जैन, मधुकर वाघ, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. एन. एन. गायकवाड, प्रा. डॉ. वासुदेव वले, प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, एस. आर. वाणी, संजय सूर्यवंशी, बी. एस. पाटील, संजय पाटील, मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, आर. एल. पाटील, प्रा. आर. एस. मांडोळे, विकास पाटील, सुदर्शन सोनवणे, जे. एन. पाटील, रमेश चौधरी, प्रताप सूर्यवंशी, प्रा. भागवत महालपुरे, प्रकाश पाटील, रणजीत पाटील, आकाश वाघ, शालिग्राम मालकर, न. पा. चे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, डॉ. सचिन भोसले, प्रा. नितीन पाटील, प्रा. गौरव चौधरी, कोमल वाघ, शांताराम चौधरी, संजय करंडे, प्राचार्य विश्वास साळुंखे, प्रशांत नागणे, अजय अहिरे, नरेंद्र ठाकरे, डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. मनीष बाविस्कर, एस. एन. पाटील, आर. एस. तडवी, अजय सिनकर,  सतीश देशमुख आदि उपस्थित होते. याप्रसंगी शांताराम चौधरी, विनय जकातदार यांनी स्व ओंकार अप्पांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.

स्व. ओंकार (अप्पा) वाघ यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित रंगभरण व निबंध स्पर्धेतील नंदिनी धाडी, साक्षी काटे, कल्पेश परदेशी, मानस आढाव, सुधीर लोहार, शिवाजी पाटील, इमरान तडवी, ज्योती ठाकरे, कल्याणी काळे, रमण पाटील या विजेत्यांना गौरविण्यात आले. सेवावृत्ती भागवत चौधरी, पुरुषोत्तम वाघ, मयूर वाघ उपस्थित होते.

याप्रसंगी नुकतीच एल. एल. बी. परिक्षा उत्तीर्ण झालेले महेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पाचोरा व भडगाव तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बी. एन. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सी. एन. चौधरी यांनी सूत्रसंचलन तर ललित वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version