बांबरुड राणीचे येथे महा लसीकरण शिबिर

पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथे महा लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २ हजार ५०० जणांचे लसीकरण करण्यात आले.

 

माजी आमदार दिलीप वाघ यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या व ग्रामपंचायत बांबरुड (राणीचे) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, नांद्रा यांचे सहकार्याने पंचायत समिती गटनेते ललित वाघ, नितीन तावडे यांच्या विशेष प्रयत्नाने  दि. २७ रोजी महालसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन माजी आमदार दिलीप वाघ व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा न. पा. गटनेते संजय वाघ यांच्या हस्ते करण्यात आलेल्या शिबीरात २ हजार ५०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. यावेळी पाच बूथ लावून महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे बूथचे नियोजन करण्यात आले होते. नागरिकांनी या शिबिरात उत्साहाने लसीकरण करून घेतले. यावेळी पं. स. गटनेते ललित वाघ, स्थानिक चेअरमन दगाजी वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, बांबरुड (राणीचे) येथील सरपंच अस्तना तडवी, उपसरपंच शशिकांत वाघ, ग्रामपंचायत सदस्य गुलाब तडवी, राजेंद्र गवांडे, प्रेमराज शेवगे, प्रदीप वाघ, पिताम्बर बाविस्कर, शोभा वाघ, आली मेवाती, सुभाष शिंदे, वि. का. सोसायटी चेअरमन सुधाकर शेळके, बुरहान तडवी, गजानन वाघ, प्रा. डी. व्ही. पाटील, पर्यवेक्षक जी. एन. पाटील, निलेश पाटील, गौरव पाटील, हेमंत पाटील, प्रशांत पाटील, आदी उपस्थित होते. यावेळी नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी प्रवीण रायगडे, माया सोनवणे यांनी लसीकरणाचे काम पार पाडले. व बांबरुड (राणीचे) ग्रामपंचायत कर्मचारी तसेच माध्यमिक विद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content