Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांधकाम ठिकाणाहून सागवान लाकडांची चोरी

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पूनगाव शिवारातून बांधकामाच्या ठिकाणाहून सागवान चौकटींची चोरी झाल्याचे समोर आले आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, अमित रमेश प्रजापत (वय-४७) रा. मुकुंद सोसायटी, किरण प्रभाजी शाळेजवळ पाचोरा हे व्यापारी आहेत. त्यांचे पाचोरा तालुक्यातील पुनगाव शिवारात घराचे बांधकामाचे काम सुरू आहे. दरम्यान शनिवार २६ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता बांधकामाच्या ठिकाणाहून सागवानी लाकडाच्या २० हजार रूपये किंमतीच्या ५ चौकटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी अमित प्रजापती यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सुर्यकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version