Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांधकाम कामगारांसाठी उद्या लसीकरण शिबिर

जळगाव, प्रतिनिधी | बांधकाम क्षेत्रातील कामगार व परिवारातील सदस्यांकरता  नानीबाई रुग्णालय व चेतनदास रुग्णालयात मोफत लसीकरण शिबिर रविवार दि.१७ ऑक्टोबर रोजी मिशन कोरोनामुक्त जळगाव अंतर्गत आयोजित करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्राच्या बांधकाम कामगारांसाठी राज्यव्यापी लसीकरणाच्या मोहिमेअंतर्गत क्रेडाई जळगाव व जळगाव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन यांच्यामार्फत रविवार १७ ऑक्टोबर रोजी होत आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरातील बांधकाम कामगार बांधव, त्यांचे परीवारातील सदस्यां करिता १७ ऑक्टोबर रविवारी एक दिवसीय मोफत लसीकरण मोहीम आयोजीत झाली आहे. कार्यक्रमाचे उद्धाटन महापौर जयश्री महाजन ह्या करणार आहेत. लसीकरण अंतर्गत नानीबाई अग्रवाल रुग्णालयात कोविशिल्ड तर चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सीन दिली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. येताना सोबत आधार कार्ड व ओटीपी साठी मोबाईल आणावेत. कामगार बांधवांनी त्यांच्या परीवाराचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन क्रेडाई, महाराष्ट्रचे सहसचिव अनिष शाह, जळगांवचे अध्यक्ष  हातीम अली, सचिव दीपक सराफ , जळगांव सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद राठी ,सचिव मिलिंद काळे व प्रकल्प प्रमुख तुषार तोतला ह्यांनी केले आहे .

Exit mobile version