Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसस्थानक परिसरात पाकीटमार चोरट्याला रंगेहात पकडले

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर प्रस्थानक परिसरात बसमध्ये चढताना एका प्रौढ व्यक्तीच्या खिशातून पैसे काढत असताना एका संशयित आरोपीला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक सुरेश चिकाटे (वय-४५) रा. चिकाटे गल्ली, अमळनेर हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १८ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास दीपक चिकाटे हे त्यांचे मामा सुरेश लाड यांना सोडण्यासाठी अमळनेर बसस्थानकात आले होते. त्यावेळी त्यांचा मामा बसमध्ये चढत असताना संशयित आरोपी सय्यद अरबाज सय्यद यासीन रा. नवीन फॉरेन हॉस्पिटल, मालेगाव याने दीपक चिकाटे यांच्या खिशाच्या हात घालून ३०० रूपयांची रोकड चोरून नेत असतांना त्याला पकडले. दरम्यान संशयित आरोपी सय्यद अरबाज सय्यद यासीन याला अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संदर्भात दीपक चिकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version