Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसमध्ये चढतांना विवाहितेच्या पर्समधील ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढतांना गर्दीचा फायदा चोरट्याने विवाहितेच्या पर्समधील रोकड व दागिण्यांसह ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवार, २४ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

धुळे जिल्ह्यातील राणमाळा येथील विवाहिता सौ कविता जिभाऊ पाटील वय ३५ हे माहेरी बांबरुड येथे जाण्यासाठी सोमवारी सकाळी जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात आल्या. याठिकाणी पाचोरा जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना कविता पाटील यांच्या पर्समधील पाकीटातील सोन्याचा नेकलेस व कानातील असे एकूण ३७ हजार रुपयांचे दागिणे व ४ हजार ५०० रुपयांची रोकड असा ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. बसमध्ये बसल्यानंतर कविता पाटील यांना पर्समध्ये ठेवलेले दागिणे व तसेच रोकड दिसून आली नाही. बसमध्ये प्रवाशांना विचारपूस केली, तसेच बसस्थानकात शोध घेतला मात्र ऐवज मिळून आला नाही. अखेर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कविता पााटील यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अज्ञात चोरयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक पल्लवी मोरे ह्या करीत आहेत.

Exit mobile version