Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक ; सुरक्षित प्रवासाऐवजी आरोग्य धोक्यात

 

यावल, प्रतिनिधी । राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला असून सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत असतांना एसटी महामंडळच्या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशीचे वाहतूक करून शासनाच्या आदेशास केराची टोपली दाखवण्यात येत आहे.  

राज्य शासनाने सार्वजनिक व यात्रा, उरूस असे धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे आदी प्रतिबंधित करण्यात आले आहेत. दुसरीकडे मात्र एसटी महामंडळाच्या एसटी बसमधून प्रवासी क्षमतेपेक्षा दुप्पट्टीने प्रवाशी वाहतुक करून उघडपणे प्रवाशांच्या जिवाशी खेळ केला जात आहे. तात्काळ प्रशासनाने दुर्लक्षीत होत असलेल्या एसटी बसच्या कोरोना संसर्गास आमत्रंण देणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर वेळीच महामंळाने सुरक्षीत वाटणाऱ्या एसटी बस प्रवाशी संख्येवर नियंत्रण आणावे तसे न झाल्यास परिस्थिती ही आटोक्याच्या बाहेर जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, लांब पल्याच्या एसटी बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा अधिक संख्येने मोठया प्रमाणावर प्रवासी कोंबुन भरतांना दिसुन येत आहे. तालुक्यातील इतर बेकाद्याशीर प्रवाशी वाहतुक करणाऱ्या कालबह्याय झालेल्या मिनीडोअरमध्ये तर १२ ते १५ प्रवासी कोंबुन भरण्यात येवुन प्रवासी वाहतुक करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कालबाह्याय झालेल्या वाहनातुन प्रवाशांची वाहतुक करण्यात येत असून कोरोना विषाणु संसर्गाचे शासन नियम हे या अवैध्य प्रवासी वाहतुकीस लागु होत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Exit mobile version