Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद ते जळगाव रस्त्यावर असलेल्या दूरदर्शन टॉवर जवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात गुरुवार १३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता बसचालकावर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कडूबा रामकृष्ण बाविस्कर (वय-३१) रा. नाडगाव ता. बोदवड हा तरुण ५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता त्याची दुचाकी (एमएच १२ जी ५४७) ने जळगावकडून नशिराबाद येथे जात होता. राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळ समोरून येणारी बस क्रमांक (एमएच १४ बीटी ९८) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार असलेला कडूबा बाविस्कर हा रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेबाबत गुरुवार १३ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता कडूबा बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस क्रमांक (एमएच १४ बीटी ९८) वरील अज्ञात चालक विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास सहाय्यक फौजदार अलीयार खान करीत आहे.

Exit mobile version