Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बसचालक आत्महत्या प्रकरण : सुसाईड नोट कुटुंबियांकडून हस्तगत

जळगाव प्रतिनिधी । नियमित पगार होत नसल्याने कंटाळून जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील एसटीचालकाने सुसाईड नोट लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली होती. लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांनी कुटुंबीयांकडून हस्तगत केली आहे.

एसटी महामंडळातील कमी पगार आणि अनियमितता याला कंटाळुन जळगाव आगारात वाहक म्हणून नोकरीला असलेल्या मनोज अनिल चौधरी (वय 30) रा. कुसुंबा ता.जि. जळगाव या कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी मनोज यांची पत्नी, वडील व भाऊ या तिघांची भेट घेतली त्यांनी लिहून ठेवलेले चिठ्ठी कुटुंबाकडून हस्तगत केली आहे. अधिक चौकशी केली असता चिठ्ठीतील मजकूर याप्रमाणेच कुटुंबियांनी तोंडी माहिती दिली. पोलिसांना जबाब नोंदविले शक्य झाले नाही. त्यामुळे दोन दिवसात तिघांचे जबाब नोंदविले जाणार आहे. मयत मनोज यांनी सोमवार 9 नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी सुसाईड नोट मध्ये एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. मनोज चौधरी यांना आत्महत्या करण्यासाठी का भाग पडले, नेमकी काय होती, कधीपासून पगार मिळाला नव्हता व किती पगार त्यांना होता, याशिवाय ड्युटीची माहिती मिळवण्यासाठी आगर प्रमुखांकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version