Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बळीराम पेठेतून दुचाकी लंपास; चोरट्यांविरोधात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठेतून अंगणात लावलेली दुचाकी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, फारूख हुसेन गवळी (वय-२७) रा. बळीराम पेठ जळगाव हे दाणाबाजार येथे मालगाडीवर हमालीचे काम करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीयू ००३६) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमी प्रमाणे नेहमीप्रमाणे सायंकाळी कामवरून आले. फारूख गवळी यांनी दुचाकी घराच्या अंगणात लावली. सर्वजण रात्री १२ वाजेच्या सुमारास झोपले. सकाळी जीमला जाण्यासाठी फारूख गवळी उठले असता त्यांना अंगणात लावलेली दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी घरातील सदस्यांनी विचारले असता कोणीही दुचाकी नेली नसल्याचे सांगितले. गल्लीत शोध घेतले असता दुचाकी मिळून आली नाही. आज सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version