Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बलात्काराच्या आरोपातून तरुण तेजपाल निर्दोष मुक्त

 

पणजी ( गोवा ) : वृत्तसंस्था । तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून आता निर्दोष मुक्तता झाली आहे.

 

सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गोवा सत्र न्यायालयात खटला सुरु होता.

 

तरुण तेजपाल हे तेहलका मॅगझिनचे मुख्य संपादक होते. २०१३ मध्ये ते एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टमधून जात असताना त्यांनी   सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप त्यांच्यावर होता. गोवा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली.

 

 

मे २०१४ पासून त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चिात करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती.

 

Exit mobile version