Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बलरामपूरमध्ये आणखी दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, हत्या

 

 

बलरामपूरः वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित मुलीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या धक्क्यांतर नागरिक सावरलेलेही नसताना बलरामपूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

दोन मित्रांनी मैत्रीच्या बहाण्याने दलित मुलीला बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिची कंबर आणि पाय मोडले गंभीर अवस्थेत असलेल्या या मुलीला रिक्षातून घरी पाठवले. नंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तिला आधी इंजेक्शन दिलं गेलं आणि मग तिच्यावर आत्याचार केला गेला, असा पीडित मुलीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. प्रचंड वेदना होत आहेत. आता मी वाचू शकणार नाही, असं गंभीर अवस्थेत आलेल्या मुलीने मृत्युपूर्वी म्हणाल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं.

एका आरोपीचे नाव शाहिद आहे. दुसऱ्या आरोपीचं नाव साहिल आहे. दोघेही गैंसडीचे राहणारे आहेत दोन्ही आरोपींना अटक केल्याचं बलरामपूर पोलिसांनी सांगितलं. पीडितेचे हात, पाय आणि कंबर तोडल्याची बाब पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पुष्टी झालेली नाही.

पीडित मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गंसडी कोतवाली परिसरातील आहे. बी-कॉमच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी पचपेडव्याच्या महाविद्यालयात गेली होती.

सायंकाळी एका रिक्षाचालकाने मुलीला बेशुद्ध अवस्थेत तिच्या घराजवळ सोडलं. कुटुंबीयांनी मुलीला रूग्णालयात तातडीने दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. महाविद्यालयातून परतत असताना मुलीचं अपहरण करण्यात आलं आणि गंसडी शहरातील एका खोलीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

ज्या खोलीत सामूहिक बलात्कार झाला ती एका किराणा दुकानाची मागची बाजू आहे. किराणा दुकान चालवणारा तरुणच या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जातंय. सामूहिक बलात्कारानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने आरोपींनी एका खासगी डॉक्टराला तिच्यावर उपचार करण्यासाठी बोलावलं होतं. पण डॉक्टराने खोलीत एकटं पडलेलं पाहून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला आणि तिच्या घरच्यांना कळवलं.

Exit mobile version