Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश: २३ जणांविरोधात गुन्हा दाखल

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमेरीकन नागरीकांना व्हायग्रा आणि सियालिस नावाची औषधी विक्री करून फसवणूक करणारी वाशी परिसरातील एका मॉलमधील  बनावट कॉल सेंटरचा फर्दाफाश करण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या २३ लोकांमध्ये बनावट कॉल सेंटरचा मालक आणि व्यवस्थापकाचाही समावेश आहे.

अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली

संशयित आरोपींनी  अमेरिकन नागरिकांचं क्रेडिट आणि डेबिट कार्डचा तपशील मिळवून त्यांची फसवणूक केली. त्यांनी सांगितलं की, शनिवारी केलेल्या छापेमारीत ३ लाख ९७ हजार रुपये किमतीच्या हार्डडिस्क आणि इलेक्ट्रिकल उपकरणांसह अनेक गॅजेट्स जप्त करण्यात आले. आरोपींनी vcdial/Nextiva सॉफ्टवेअर वापरून आउटबाउंड कॉल केले. त्यांनी गेटवे बायपास आणि VoIP द्वारे देखील कॉल केले होते.

पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना अधिकारी म्हणाले की, आम्ही आरोपींना फसवणूक करताना रंगेहाथ पकडलं. कॉल सेंटरच्या मालकावर आरोप आहे की त्यानं मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीकडून अमेरिकेन लोकांचा डेटा खरेदी केला. त्यानंतर त्याने आपल्या कर्मचाऱ्यांकडून औषधे विकण्याच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची फिशिंग करण्यास सुरुवात केली. या कॉल सेंटरचे कर्मचारी ओळख लपवून किंवा चुकीची माहिती देऊन कॉल करत असत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात २३ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version